Dying in Dharavi Nala, the son's death | धारावीत नाल्यात पडून मुलाचा मृत्यू
धारावीत नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबई : धारावी येथील राजीव गांधी कॉलनीशेजारील नाल्यात पडून सात वर्षीय मुलाचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा श्निवारी मृत्यू झाला होता. त्याआधी बुधवारी गोरेगाव येथे नाल्यात वाहून गेलेल्या दीड वर्षीय मुलाचा अजून शोध लागलेला नाही. तोच पुन्हा हा प्रकार घडला आहे. आठवड्याभरातील मुंबईतील ही तिसरी घटना आहे.
धारावीतील पिवळा बंगला, राजीव गांधी कॉलनीजवळच्या नाल्याशेजारी सुमीत जैसवार हा आपल्या भावासोबत खेळत असताना त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला. त्याच्या भावाने मदतीसाठी आरडाओरड करताच स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र सायन रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचे तीव्र पडसाद रहिवाशांमध्ये उमटत आहेत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Web Title: Dying in Dharavi Nala, the son's death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.