‘आॅन ड्युटी’ नसताना बजावली ‘ड्युटी’

By Admin | Updated: April 22, 2016 02:18 IST2016-04-22T02:18:19+5:302016-04-22T02:18:19+5:30

आॅन ड्युटी नसतानादेखील दोन अंमलदारांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळ काढत असलेल्या लुटारूच्या मुसक्या आवळल्या.

'Duty' was played without 'Aan Duty' | ‘आॅन ड्युटी’ नसताना बजावली ‘ड्युटी’

‘आॅन ड्युटी’ नसताना बजावली ‘ड्युटी’

मुंबई : आॅन ड्युटी नसतानादेखील दोन अंमलदारांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळ काढत असलेल्या लुटारूच्या मुसक्या आवळल्या. ही बाब पोलीस दलाला समजताच त्यांचे पोलीस दलातून कौतुक करण्यात आले. अनंत शिरसाठ आणि अभिजित साळुंखे असे दोघा पोलीस अंमलदारांचे नाव आहे.
गिरगावच्या खेतवाडी मुख्य मार्गावर पोलीस वसाहतीसमोर व्यापारी संजय मेहता यांचे दुकान आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास मेहता दुकान बंद करून घरी निघत होते. दरम्यान, तेथे आलेल्या लुटारूने त्यांना धक्का देत त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. याबाबत मेहता यांनी आरडाओरड करताच खेतवाडी पोलीस वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले अनंत शिरसाठ आणि अभिजित साळुंखे सतर्क झाले. त्याचदरम्यान एक लुटारू बॅग घेऊन पळत असताना त्यांना दिसला. त्यांनी तत्काळ त्या लुटारूचा पाठलाग करीत त्याला पकडले. झाकीर अन्सारी असे त्याचे नाव असून, तो पनवेल येथील रहिवासी आहे. त्याचा मानसरोवर स्थानकावर फळविक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी तो गिरगाव येथील मित्राकडे आला होता. त्याने आतापर्यंत आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Duty' was played without 'Aan Duty'