दारुड्याने पत्नीस जिवंत जाळून मारले
By Admin | Updated: January 18, 2015 01:43 IST2015-01-18T01:43:15+5:302015-01-18T01:43:15+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत पतीने पत्नीला रॉकेल ओतून ठार मारल्याचा प्रकार तळोजा परिसरात घडला.

दारुड्याने पत्नीस जिवंत जाळून मारले
तळोजा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत पतीने पत्नीला रॉकेल ओतून ठार मारल्याचा प्रकार तळोजा परिसरात घडला.
रामदास जनू कांबळे (४५) असे या आरोपीचे नाव असून, त्याने पत्नी मनीषा जनू कांबळे (४०) हिला क्षुल्लक कारणावरून रॉकेल अंगावर ओतून ठार मारले. पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला. तळोजातील घोटगाव येथील शंकर पाटील यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम
करणारे हे दाम्पत्य वीटभट्टीशेजारीच राहत होते.
शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हे दाम्पत्य आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी असताना दारूच्या नशेत रामदास याने पत्नीसोबत वाद घालत घरातील रॉकेलचा कॅन मनीषाच्या अंगावर ओतला व तिला जाळून मारले. आरोपी रामदास यास तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, साहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कासजेकर अधिक तपास करीत
आहेत. (वार्ताहर)