Join us  

लॉकडाऊन काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे करण्यावर दिला भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:23 PM

लॉकडाऊन काळात उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. या काळात रेल्वे प्रशासन पायाभूत कामे करण्यावर भर देत आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. या काळात रेल्वे प्रशासन पायाभूत कामे करण्यावर भर देत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर, जेएनपीटी-पनवेल यादरम्यान कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेत रेल्वेतील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली गेली आहेत. 

लॉकडाऊन कालावधीचा उपयोग कुर्ला ते टिळक नगर दरम्यानच्या जलमार्गाच्या रुंदीकरणाचे काम, जसईजवळील कराळ रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान विद्यमान प्री-स्ट्रेस्ड स्लॅब पुल ४.५ मीटर स्पॅनचा असून ब्राह्मणवाडी नाल्याला जोडलेला अहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या जादा पाण्याच्या मार्गाला जागा देण्यासाठी अतिरिक्त बॉक्स टाकण्यात आले. दोन ब्लॉक घेऊन १२ बॉक्सेस टाकण्यात आले. यासाठी महापालिका आणि राज्य सरकारशी समन्वय साधुन मशीन आणि मनुष्यबळाची सोय करण्यात आली.या कामाची तयारी ४ मेपासून सुरू केली होती. पहिल्या ब्लॉकमध्ये कट अँड कव्हर पद्धतीने ६ बॉक्स टाकण्यात आले. ८ मे रोजी दुसर्‍या ब्लॉकमध्ये आणखी ६ बॉक्सेस टाकण्यात आले. रोड क्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी दोन टॉवर वॅगन वापरुन ओएचई स्लीव्ह केले.  ४०० टन क्षमतेची क्रेन, २ डंपर, २ पोकलेन्स, १ जेसीबी, ८० कामगार, ८ पर्यवेक्षक, २ अधिकारी इत्यादींनी हे काम पूर्ण करण्यासाठी अखंड काम केले. या अतिरिक्त बॉक्समुळे जलमार्ग ४.५ मीटर वरुन १०.५ मीटर करण्यात आला आहे.

 माल वाहतुकीस अडथळा न आणता जसाई जवळील कराल रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर लॉंचींगचे काम पूर्ण केले. चौथ्या टर्मिनलला जोडण्यासाठी कराळ रोड ओव्हर ब्रीजचे महत्वपुर्ण पायाभूत कामे केली गेली आहेत. या रोड ओव्हर ब्रीजसाठी ५४ मीटरचे ९० एमटी वजनाचे ७ संयुक्त स्टील गर्डर आणण्याचे आव्हानात्मक काम होते. जेएनपीटीकडून माल वाहतुकीला अडथळा न आणता फिजिकल डिस्टन्सचे पालन करून दोन क्रेनच्या साहाय्याने २० कामगारांनी काम पूर्ण केले.

 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामुंबई