Join us  

लॉकडाऊनच्या काळात सायबरची  राज्यात एकूण १६१ गुन्हे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:21 PM

लॉक डाऊन च्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल झाले आहेत.

३६ आरोपींना अटक

मुंबई : लॉक डाऊन च्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे . 

 राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण १६१ गुन्हे ९ एप्रिल पर्यंत दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ८९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ३६ आरोपींना अटक केली आहे .  कुलाबामध्ये एक गुन्हा, मुंबईमध्ये कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये शनिवारी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे .सदर आरोपीने एका विशिष्ट मेडिकल स्टोअरच्या स्टाफला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.  मेसेज व्हाट्सअँपद्वारे सगळीकडे पसरविला होता .

व्हाट्सअँप वापरताना घ्यावयाची दक्षता, तुम्ही व्हाट्सअँप ग्रुपचे सदस्य असाल तर  चुकीच्या /खोट्या बातम्या,द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये. ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती पुढे कोणालाही पाठवू नये .  जर आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी/चुकीची ,आक्षेपार्ह बातमी ,व्हिडिओज  ,मेमे किंवा पोस्ट्स येत असतील की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात ,अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप ऍडमिनला सांगून तुम्ही  नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती   संकेतस्थळावर  पण देऊ शकता.  

 ग्रुप ऍडमिन, ग्रुप निर्माते  असाल तर काय करावे?

ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य हा एक जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करावे.सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगावी. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा.परिस्थिती अनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin असे करावे.

टॅग्स :गुन्हेगारीकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस