गेल्या वर्षभरात ४९ हजार क्षयरुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:52 AM2019-09-19T05:52:59+5:302019-09-19T05:53:04+5:30

गेल्या वर्षभरात शहर - उपनगरात ४९ हजार २४२ क्षयरुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

During the last year, 90,000 tuberculosis cases were reported | गेल्या वर्षभरात ४९ हजार क्षयरुग्णांची नोंद

गेल्या वर्षभरात ४९ हजार क्षयरुग्णांची नोंद

Next

- स्नेहा मोरे 
मुंबई : गेल्या वर्षभरात शहर - उपनगरात ४९ हजार २४२ क्षयरुग्णांची नोंद करण्यात आली आहे. प्रजा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे निरीक्षण समोर आले आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक क्षयरुग्ण एल प्रभाग म्हणजेच कुर्ला परिसरात आढळले असून त्यांची संख्या ७६८ इतकी आहे. पालिका प्रशासनाने क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी नुकतेच रुग्णशोध अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे, या माध्यमातून क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
२०१७ साली शहर - उपनगरात क्षयरोगाने जवळपास ५ हजार ४४९ रुग्णांचा बळी गेल्याचे निरीक्षण अहवालात मांडले आहे. यानुसार, दिवसाला सरासरी १५ जणांचा क्षयरोगाने बळी गेल्याचे अहवालात म्हटले आहे. वाढत्या क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संस्थेच्या अहवालानुसार, २०१७ च्या तुलनेत रुग्णसंख्येत किंचित घट असली तरीही मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे.
कुर्ल्याप्रमाणेच मालाड परिसरातही क्षयरोगाचे ६०७ रुग्ण, सांताक्रुझमध्ये ५५८ रुग्ण आढळले आहेत. कुर्ला परिसरात गेल्या पाच वर्षांत सातत्याने क्षयाचे प्रमाण वाढते असून रुग्णसंख्याही हजाराच्या टप्प्यात असल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार, ८२ टक्के रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयांत असून १३ टक्के रुग्णांची नोंद पालिकेच्या दवाखान्यांत आहे. तर पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि कांदिवली येथे अनुक्रमे १६ आणि ७९ सर्वांत कमी क्षयरुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
>पालिकेची रुग्ण शोधमोहीम
क्षयाच्या प्रतिबंधासाठी पालिकेकडून रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत असून या अंतर्गत क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्याप औषधोपचारापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात येणार आहेत.
मोहिमेदरम्यान प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाºया व्यक्ती शोधणे. संशयित क्षयरुग्णांच्या थुंकीचे नमुने व क्ष किरण तपासणीसह आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करून क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरू करणे यासोबतच समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येईल.
>गेल्या पाच वर्षांतील रुग्णांची संख्या
वर्ष रुग्णसंख्या मृत्यू
२०१४ ४३ हजार २६२ ६ हजार ५८९
२०१५ ४१ हजार८३८ ५ हजार ६९३
२०१६ ४६ हजार ४८३ ६ हजार ६६०
२०१७ ५५ हजार १४५ ५ हजार ४४९
२०१८ ४९ हजार २४२ नोंद उपलब्ध नाही.
>कुर्ला परिसरातील रुग्णसंख्या
२०१४ १ हजार १८८
२०१५ १ हजार ३३८
२०१६ १ हजार ४०६
२०१७ ८२१
२०१८ ७६८

Web Title: During the last year, 90,000 tuberculosis cases were reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.