राज्यात दिवसभरात ४,४५६ रुग्ण वाढ, तर १८३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:55+5:302021-09-02T04:13:55+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी ४,४५६ रुग्णांचे निदान झाले असून १८३ काेरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ...

राज्यात दिवसभरात ४,४५६ रुग्ण वाढ, तर १८३ मृत्यू
मुंबई : राज्यात बुधवारी ४,४५६ रुग्णांचे निदान झाले असून १८३ काेरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ५१,०७८ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात दिवसभरात ४,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६२,७७,२३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के झाले आहे.
राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४१,५४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.९५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,९०,४२७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४, ६९, ३३२ झाली असून मृतांचा आकडा १,३७,४९६ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १८३ मृत्यूमध्ये मुंबई ४, नवी मुंबई मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ५, नाशिक १, अहमदनगर ६,जळगाव २, पुणे १३, पुणे मनपा ३२, पिंपरी चिंचवड मनपा ११, सोलापूर २३, सातारा १९, कोल्हापूर १३, सांगली १६, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग ६, रत्नागिरी २२, औरंगाबाद मनपा १, उस्मानाबाद १, अमरावती १, बुलडाणा १ इ रुग्णांचा समावेश आहे.
१० दिवसांतील रुग्णवाढ - २२ ते ३१ ऑगस्ट
राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते आहे याखेरीज राज्यातील सहा जिल्ह्यांमधील काेराेना प्रादुर्भावाची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. आता सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्य व स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे ९ हजार ५०६
अहमदनगर ७ हजार १४
सातारा ५ हजार ३९०
सोलापूर ४ हजार ६९२
सांगली ४ हजार २८६
एकूण ३० हजार ८८८
अन्य जिल्हे १३ हजार ४७८