During the day, 5,760 patients and 62 died in the state | राज्यात दिवसभरात काेराेनाचे ५ हजार ७६० रुग्ण, ६२ मृत्यू

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ५ हजार ७६० रुग्ण, ६२ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात काेराेनाच्या ५ हजार ७६० रुग्णांचे निदान झाले असून ६२ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ झाली असून बळींचा आकडा ४६ हजार ५७३ झाला आहे.

दिवसभरात ४ हजार ८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, आतापर्यंत १६ लाख ४७ हजार ४ जण काेराेनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सध्या राज्यात ७९ हजार ८७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६२ मृत्यूंमध्ये मुंबई १७, नाशिक ४, नाशिक मनपा ३, पुणे ३, पुणे मनपा ८, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर १०, सोलापूर मनपा २, सातारा ७, अकोला ३, अकोला मनपा १, यवतमाळ १, बुलडाणा २ या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या राज्यात ५ लाख २२ हजार ८१९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ५६९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १ लाख २० हजार ४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.५३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अशी आहे रुग्णसंख्या

१० नोव्हेंबर - ३७९१

१५ नोव्हेंबर - २५४४

२० नोव्हेंबर - ५४६०

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: During the day, 5,760 patients and 62 died in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.