Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 18:38 IST

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मुंबईः पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ऐन कार्यालय सुटण्याच्या वेळेत ही वाहतूक खोळंबल्यानं चाकरमन्याचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं धावत आहे. गेल्या काही तासांपूर्वी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सांताक्रूझ आणि विलेपार्लेदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला असून, त्यामुळे दोन्ही मार्गांवरची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू होती. ऐन सकाळच्या कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

टॅग्स :रेल्वे प्रवासीलोकल