मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५३१ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:34+5:302021-02-05T04:25:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत गुरुवारी ५११ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८११ रुग्ण ...

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५३१ दिवसांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गुरुवारी ५११ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८११ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५३१ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ५२० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत शहर, उपनगरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, पालिक प्रशासन व सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २७ लाख ५६ हजार ७३८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात काेराेनाच्या ३९४ रुग्णांचे निदान झाले असून, ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख ७ हजार ५६३ झाली असून मृतांचा एकूण आकडा ११ हजार ३२६ झाला आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २०३ असून २ हजार २९० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३ हजार ४१० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला.
...................