पावसाळी आजारांचे प्रमाण यंदा घटले
By Admin | Updated: August 31, 2014 01:29 IST2014-08-31T01:29:27+5:302014-08-31T01:29:27+5:30
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचे आजारी पडण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलतेन कमी झाल्याचे दिसून आले आहे.

पावसाळी आजारांचे प्रमाण यंदा घटले
मुंबई : पावसाळा ऋतूची सुरुवात झाली की मुंबईकर रस्त्यावरचे खड्डे, साचलेले पाणी आणि आजारांमुळे नेहमीच त्रस्त होतात. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचे आजारी पडण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलतेन कमी झाल्याचे दिसून आले आहे. जुलैमध्ये वाढलेला आजारांचा जोर ऑगस्ट महिन्यात ओसरला आहे.
पावसाळ्यात डासांमुळे होणा:या आजारापासून कसा बचाव करावा याविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठिकठिकाणी पोस्टर लावली होती. योग्य प्रमाणात पाऊसही यंदा जुलै - ऑगस्टदरम्यान झाला असला, तरी एकूणच पावसाळी आजारांमध्ये घट झालेली असताना तापाचे रुग्ण मात्र वाढलेले आहेत. जून 2क्13मध्ये 3 हजार 713 तापाचे रुग्ण आढळले होते तर जून 2क्14मध्ये 4 हजार 642 रुग्ण आढळून आले आहेत. जून 2क्13मध्ये मलेरियाचे 858 रुग्ण आढळले होते, तर यंदा 566 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात लेप्टोचे 21 रुग्ण आढळून आले होते तर यंदाच्या जूनमध्ये दोनच रुग्ण आढळून आल़े डेंग्यूचे 32 रुग्ण गेल्या वर्षी होते तर 27 रुग्ण जून 2क्14मध्ये आढळले. जून 2क्13मध्ये गॅस्ट्रोचे 1 हजार 297 रुग्ण आढळले होते तर यंदा फक्त 91क् रुग्ण आढळले होते.
ऑगस्ट 2क्13मध्ये तापाचे 8 हजार 1क्क् रुग्ण आढळले होते, तर ऑगस्ट 2क्14मध्ये 5 हजार 495 इतके रुग्ण आढळले आहेत. जुलै 2क्13मध्ये मलेरियाचे 1 हजार 262 रुग्ण आढळले होते तर यंदा जुलैमध्ये 848 मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा 16 डेंग्यूचे रुग्ण कमी आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये 3 हजार 6क्4 गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले होते तर जुलै 2क्14मध्ये 1 हजार 986 रुग्ण आढळून आले आहेत. टायफॉइडचे 152 रुग्ण जुलै 2क्13मध्ये आढळले होते तर जुलै 2क्14मध्ये 117 रुग्ण आढळून आले होते. ऑगस्ट 2क्13मध्ये टायफॉईडचे 2क्6 रुग्ण आढळून आले होते तर यंदाच्या ऑगस्टमध्ये अर्धे म्हणजे 1क्8 रुग्ण आढळून आले आहेत.
ऑगस्ट 2क्13मध्ये मलेरियाचे 1 हजार 3क्2 रुग्ण आढळून आले होते तर यंदा फक्त 727 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूचे 87 रुग्ण आढळले होते तर यंदा ऑगस्टमध्ये फक्त 43 रुग्ण आढळून आले
आहेत. (प्रतिनिधी)
जुलै महिन्यातही तापाचा आलेख चढता दिसून आला. इतर आजारांची संख्या कमीच झाली होती. जुलै 2क्13मध्ये 6 हजार 264 तापाचे रुग्ण आढळले होते, तर यंदाच्या जुलैमध्ये हा आकडा 7 हजार 54क् इतका झाला होतो. ऑगस्टमध्ये तापाचे रुग्ण कमी झाले आहेत.
2क्14
आजारजूनजुलैऑगस्टताप4642754क्5494
मलेरिया566848727
लेप्टो21417
डेंग्यू275245
स्वाइन फ्लू11क्
गॅस्ट्रो91क्1986815
टायफॉइड8क्1171क्8
हीपॅटायटिस96176119
चिकनगुनिया5क्क्
कॉलरा131
2क्13
आजारजूनजुलैऑगस्टताप3713626481क्क्
मलेरिया858126213क्2
गॅस्ट्रो129726क्41क्65
टायफॉईड791522क्6
हीपॅटायटिस73152177
लेप्टो212416
डेंग्यू326687
कॉलरा124419
स्वाइन फ्लू221क्
चिकनगुनिया86क्