मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:19+5:302021-06-11T04:06:19+5:30

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६६ दिवसांवर येऊन पोहोचला ...

The duration of doubling of patients in Mumbai is 566 days | मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६६ दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६६ दिवसांवर

googlenewsNext

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५६६ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. तर दि. ३ ते ९ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२ टक्के आहे. शहर उपनगरात सध्या १५ हजार ८११ रुग्ण उपचाराधिन आहेत, अशी माहिती पालिकेच्या आऱोग्य विभागाने दिली आहे.

शहर उपनगरात गुरुवारी ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ८१ हजार २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत दिवसभरात ६६० रुग्ण आढळले असून, २२ मृत्यू झाले आहेत. मुंबईचा दैनंदिन मृत्यूदर २.१२ टक्के आहे. मुंबईतील १५ हजार ८११ सक्रिय रुग्णांमध्ये १ हजार ११० रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत तर ९ हजार ३१४ लक्षणविरहीत रुग्ण असून, ५ हजार ५३३ रुग्णांमध्ये सौम्य व मध्यम प्रकारची लक्षणे आहेत.

आता मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १४ हजार ४५० असून, मृतांचा आकडा १५ हजार १२२ आहे. शहर उपनगरात दिवसभरात २५ हजार ३९६ चाचण्या कऱण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ६५ लाख ३४ हजार ९६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात २५ सक्रिय कन्टेनमेंट झोन्स आहेत तर ९३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील चोवीस तासात रुग्णांच्या संपर्कातील ७ हजार ७३६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध पालिकेने घेतला आहे.

२१ हजार ५३४ बेड रिक्त

पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार, २७ हजार ५७० खाटांपैकी केवळ ६ हजार ३६ बेड आरक्षित असून, रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २१ हजार ५३४ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन बेडची क्षमता १० हजार ९७७ असून, त्यातील २ हजार ४०८ बेड आरक्षित असून, रुग्णावंर उपचार सुरु आहेत, तर ८ हजार ५६९ बेड रिक्त आहेत. याखेरीज व्हेंटिलेटर बेडची क्षमता १ हजार ४५७ आहे, त्यातील १ हजार ८ खाटा आरक्षित असून, ४४९ बेड रिक्त आहेत.

Web Title: The duration of doubling of patients in Mumbai is 566 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.