मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:14+5:302021-02-05T04:25:14+5:30
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांवर पोहोचला आहे. ...

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांवर
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांवर पोहोचला आहे. साेमवारी ४६० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३७३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
मुंबईत सोमवारी ३२८ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख ९ हजार २९७ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ३५९ झाला आहे. सध्या ५ हजार ५६५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख १५ हजार ४६७ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत १९२ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स असून २ हजार २२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १ हजार ९४४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
...............