हुंडाबळीच्या गुन्ह्यांचा चढता आलेख

By Admin | Updated: November 26, 2015 02:16 IST2015-11-26T02:16:50+5:302015-11-26T02:16:50+5:30

पुरोगामी राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे भयानक वास्तव आहे. आजही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होत

Duplication of dowry crimes | हुंडाबळीच्या गुन्ह्यांचा चढता आलेख

हुंडाबळीच्या गुन्ह्यांचा चढता आलेख

मुंबई : पुरोगामी राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे भयानक वास्तव आहे. आजही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होत असून मुंबईत गेल्या १० महिन्यात यासंबंधी तब्बल ५०० गुन्हे दाखल आहेत. हुंडाविरोधी दिन गुरुवारी साजरा केला जात असताना त्याबाबत खऱ्या अर्थाने जागृती आणण्याची गरज
आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीपासून हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाप्रकरणी ५०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये एकीची हत्या झाली आहे तर अत्याचाराला कंटाळून ६ जणीनी आत्महत्या केली आहे. ३१ जणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्यांपैकी अवघे २०२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. आजही मुंबईसह राज्यात हुंड्याची प्रथा डोके वर काढताना दिसते. यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांसह हुंडाविरोधी संस्था पुढाकार घेत आहे.
संविधान दिनीच हुंडा विरोधी दिन साजरा करण्याबाबत राज्यभर संस्था एकवटल्या होत्या. यामध्ये नोंद असलेल्या स्त्री-पुरुष समानतेला कागदावरच न ठेवता नागरीकांच्या मनात रुजवणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार २००६ साली याबाबतचे परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले. आणि तेव्हापासून हुंडा विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
मात्र याबाबत पुरेशी जनजागृती न झाल्यामुळे हा दिवस त्या परिपत्रकापूरतीच मर्यादित राहिल्या असल्याची खंत हुंडा विरोधी चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी‘ लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)
२१ मार्च २०१५ - लग्नानंतर बंगळूरला राहत असलेल्या विक्रोळीच्या श्रावणी आंबेकरला मंगळसुत्र विकून माहेर गाठले होते. लग्नात आंबेकर कुटुंबियांनी भरघोस हुंडा देऊनही श्रावणीला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरु होता. त्यासाठी सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केल्याने तिला मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर काढले. त्यामुळे पैसे नसल्याने मंगळसुत्र विकून ती मुंबईला माहेरी परतली.
१२ जून २०१५ - जेवण बनवता येत नाही, त्यात मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून मुलुंडमध्ये हर्षा तन्ना (३१) हिने गळफास घेत आत्महत्या केली.
२०१४ - मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेली महिला पोलीस शिपाई सुमेधा राजेश चव्हाण (२८) हिने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी हुंडाबळीच्या गुन्ह्याखाली पती राजेश चव्हाण यास विक्रोळी पोलिसांनी अटक केली.

Web Title: Duplication of dowry crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.