एलईडीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

By Admin | Updated: January 24, 2015 02:34 IST2015-01-24T02:34:24+5:302015-01-24T02:34:24+5:30

शिवसेना-भाजपात मिठी नदीचा वाद रंगला असतानाच एलईडी दिवे बसविण्यावरूनही उभय पक्षांमध्ये टिष्ट्वटर वॉर पेटले आहे़

Duplicate the power from the LED | एलईडीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

एलईडीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

टिष्ट्वटर वॉर : सेनेला अंधारात ठेवून भाजपाने घेतला दिवे बसविण्याचा निर्णय
मुंबई : शिवसेना-भाजपात मिठी नदीचा वाद रंगला असतानाच एलईडी दिवे बसविण्यावरूनही उभय पक्षांमध्ये टिष्ट्वटर वॉर पेटले आहे़ मरिन ड्राइव्हवर बसविलेल्या शुभ्र दिव्यांनी राणीच्या हाराची लकाकीच हरवली, असा टोला युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे़ त्यास प्रत्युत्तर देताना संपूर्ण माहिती आणि सबुरी ठेवून प्रतिक्रिया दिल्यास त्या आवाजाला लोकशाहीत वजन मिळते, असा चिमटा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काढला आहे़
शिवसेनेला सत्तेत स्थान दिल्यानंतरही भाजपाने स्वतंत्र कारभार सुरू ठेवला आहे़ मित्रपक्षाला अंधारात ठेवून भाजपाने परस्पर मुंबईत एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला़ त्यानुसार मरिन ड्राइव्हवर दिव्यांचा प्रयोग करण्यात आला. मात्र या दिव्यांनी राणीचे सौंदर्यच चोरले असून, हे दिवे लावण्याचा निर्णय घेणाऱ्यांचे मुंबईवर प्रेमच नसल्याचा आरोप ठाकरे यांनी बुधवारी टिष्ट्वटरवरून केला़ (प्रतिनिधी)

च्मुंबईतील रस्त्यांवर १ लाख ३२ हजार ४५८ पथदिवे आहेत़ यामध्ये बेस्टचे ३९ हजार ६०३, रिलायन्सचे ८० हजार २०९ आणि एमईसीबीच्या १२ हजार ६५२ दिव्यांचा समावेश आहे़

विजेची बचत होणार
दरवर्षी २० कोटी युनिट वीज जळते़ त्यापोटी १६४ कोटींचे बिल पालिकेला भरावे लागते. नवीन दिव्यांमुळे १० कोटी युनिट विजेची बचत होईल, असा दावा शेलार यांनी केला.

Web Title: Duplicate the power from the LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.