खोटय़ा मॅसेजमुळे सोळा अटकेत
By Admin | Updated: November 16, 2014 01:50 IST2014-11-16T01:50:08+5:302014-11-16T01:50:08+5:30
व्हॉट्स अॅपवर आलेल्या खोटय़ा मॅसेजमुळे तब्बल 16 जणांना पोलिसांना अटक करावी लागली. हे प्रकरण मालाड मालवणी येथे घडले.

खोटय़ा मॅसेजमुळे सोळा अटकेत
मुंबई : व्हॉट्स अॅपवर आलेल्या खोटय़ा मॅसेजमुळे तब्बल 16 जणांना पोलिसांना अटक करावी लागली. हे प्रकरण मालाड मालवणी येथे घडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनचंद्र मजेठीया आणि मनीष मजेठीया यांची आक्सा गाव येथे 114 एकर जमीन आहे. 195क् साली राज्यपालांनी 999 वर्षाच्या भाडेपट्टीवर ही जमीन भाडेपट्टी करारावर शेती करण्यासाठी मजेठीयांना दिली. मात्र आघाडी सरकारने हा करार मोडीत काढला. त्यानंतर मजेठीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आघाडी सरकारने त्याला आव्हान देत विशेष याचिका दाखल केली. सध्या या जमिनीबाबत सुनावणी प्रलंबित आहे.
गेल्या आठवडय़ात मनीष मजेठीया यांचे वडील नवीनचंद्र मजेठीया यांचे निधन झाले असून, केस हारल्यामुळे त्यांनी सर्व जमीन गरिबांना दान केल्याचा अफवेचा संदेश सर्वत्र पसरला. त्यानंतर जमिनीवर दावा करण्यासाठी जवळपास 4क्क् जण आले. या भूखंडावर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रय} केला असता त्या 4क्क् जणांनी सुरक्षारक्षकांनाच धुडकावून लावले. या प्रकरणाची माहिती मजेठीयांना मिळताच त्यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यातील 16 जण पोलिसांना सापडले तर इतरांनी पळ काढला. पोलिसांनी पकडलेल्या सर्वावर घुसखोरीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. (प्रतिनिधी)