महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर डंपिंग ग्राऊंड
By Admin | Updated: May 27, 2014 22:47 IST2014-05-27T19:18:14+5:302014-05-27T22:47:30+5:30
नेवाळी : कल्याण पूर्व शिळफाटा रोडवरील महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नव्याने डंपिंग ग्राऊंड झाल्याने या ठिकाणी ये-जा करणार्या नागरिकांसह महावितरणच्या कामगारांना घाणीच्या साम्राज्याचा त्रास सहन करावा लागतो.

महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर डंपिंग ग्राऊंड
नेवाळी : कल्याण पूर्व शिळफाटा रोडवरील महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नव्याने डंपिंग ग्राऊंड झाल्याने या ठिकाणी ये-जा करणार्या नागरिकांसह महावितरणच्या कामगारांना घाणीच्या साम्राज्याचा त्रास सहन करावा लागतो.
या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड, खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, साई मंदिर, जकात नाका व शिळफाटा रोड, एमआयडीसी रोड जात असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, त्या ठिकाणी कचर्याचा ढीग वाढत असून त्यास अधून-मधून कोणीतरी आग लावून तो पेटवत असल्याने नागरिकांना धुराचाही सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)