दरोड्यातील कार सापडली
By Admin | Updated: January 12, 2017 04:01 IST2017-01-12T04:01:03+5:302017-01-12T04:01:03+5:30
४० लाख रु पयांच्या दरोड्यातील ९८ हजार रु पये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांना हस्तगत करण्यात

दरोड्यातील कार सापडली
अलिबाग : येथील ४० लाख रु पयांच्या दरोड्यातील ९८ हजार रु पये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सात आरोपींना पकडण्यात यश आले आहे. गुन्ह्यातील मुनीर ही महिला आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अलिबाग पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ४० लाख रु पयांपैकी ९८ हजार आणि आय २० कार हस्तगत केली आहे. मुंबई येथील व्यापारी अलिबाग येथे जागाखरेदी करण्यासाठी आला असता दरोडा टाकला होता. (प्रतिनिधी)