गावठी दारूचे अड्डे उदध्वस्त

By Admin | Updated: July 13, 2015 23:21 IST2015-07-13T23:21:36+5:302015-07-13T23:21:36+5:30

सातपाटी सागरी पोलिसांनी वडराई गावच्या समुद्रकिनाऱ्यालगत गर्द झाडींचा फायदा घेऊन उभारलेले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले.

Dump beer bunker | गावठी दारूचे अड्डे उदध्वस्त

गावठी दारूचे अड्डे उदध्वस्त

पालघर : सातपाटी सागरी पोलिसांनी वडराई गावच्या समुद्रकिनाऱ्यालगत गर्द झाडींचा फायदा घेऊन उभारलेले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले. या प्रकरणात पोलिसांच्या चार टीमने कारवाईत चार आरोपींना अटक केली असून १० आरोपींचा शोध सुरुअसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दारूअड्डा उद्ध्वस्त झाला असला तरी या वेळी दारू बनविण्याच्या कामात महिलांचा सहभाग आढळून आला. ही बनविलेली दारू मोटारसायकल, रिक्षामधून पालघरच्या गांधीनगर, लोकमान्यनगर, मोहपाडा इ. लहानमोठ्या पाड्यांमध्ये पोहोचवली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी अंशुमन मधुकर गावंड रा. वडराई, रत्नमाला राजू राऊत, चेतन शंकर हडळ, अनिल चिमणा मोरे हे सर्व रा. वडराई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून मनोहर कमलाकर मोरे, रजनी मोरे, अमित राऊत आदींचा पोलिस शोध घेत आहेत. (वार्ताहर)

अशी केली कारवाई
सातपाटी सागरी पोलीस स्टेशनअंतर्गत वडराई येथील समुद्रकिनाऱ्यालगत गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची माहिती सहा. पो.नि. भुजंग हातमोडे यांना कळली. त्यांनी सहा. पो. उपनिरीक्षक एम.बी. पाटील, हेडकॉन्स्टेबल डी.एन. अतकारी, पी.टी. मुसले, मोहणे, चौधरी इ. कर्मचाऱ्यांसह चार टीम तयार केल्या. या टीमने समुद्रकिनाऱ्यालगत २-३ किमी क्षेत्रात ७ ते ८ अड्डे उद्ध्वस्त केले.

Web Title: Dump beer bunker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.