अगरच्या लाकडांची तस्करी करणारी दुकली जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST2021-07-20T04:06:44+5:302021-07-20T04:06:44+5:30

मुंबई : अगर वृक्षाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ५६ लाख ...

Dukli, a smuggler of agarwood, caught in the fire | अगरच्या लाकडांची तस्करी करणारी दुकली जाळयात

अगरच्या लाकडांची तस्करी करणारी दुकली जाळयात

मुंबई : अगर वृक्षाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ५६ लाख ९७ हजार रुपये किमतीचे अगर लाकूड आणि तेल जप्त केले आहे.

डोंगरी येथील सेंट्रल इमारतीत अगर वृक्षाच्या लाकडांचा बेकायदेशीरपणे साठा करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने १७ जुलै रोजी याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १० लाख ३६ हजार किमतीचे २१ किलो ३० ग्रॅम वजनाचे अगर लाकूड आणि ४९ लाख ७८ हजार किमतीचे १३ किलो ९९४ ग्रॅम वजनाचे अगर तेल मिळून आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मो. हुसेन मो अब्दुल मुकीत (३७) आणि बहारुद्दीन फाजरअली (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: Dukli, a smuggler of agarwood, caught in the fire