वृद्धेच्या घरातून ७१ लाखांची रोकड़ चोरी करणारी दुक्कल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:36 IST2021-02-05T04:36:04+5:302021-02-05T04:36:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वयोवृद्धेच्या घरातून ७१ लाखांची रोकड चोरी करणाऱ्या दुकलीला जे जे मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

Dukkal arrested for stealing Rs 71 lakh cash from old man's house | वृद्धेच्या घरातून ७१ लाखांची रोकड़ चोरी करणारी दुक्कल अटकेत

वृद्धेच्या घरातून ७१ लाखांची रोकड़ चोरी करणारी दुक्कल अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वयोवृद्धेच्या घरातून ७१ लाखांची रोकड चोरी करणाऱ्या दुकलीला जे जे मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, त्याच्याकड़ून ५६ लाख ८२ हजार ९०० रुपयांची रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

नागपाडा परिसरात राहणाऱ्या मुमताज शेख (वय ५०) यांच्या घराचे कुलूप उघडून आरोपीने ७१ लाखांची रोकड लंपास केली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. तांत्रिक तपासावरून मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या मदतीने वृद्धेच्या घरातून बॅग चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली. ती मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्यापाठोपाठ तिने ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून चोरी केली, त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्याकड़े अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Dukkal arrested for stealing Rs 71 lakh cash from old man's house