घाटकोपरची शीवरथ यात्रा थाटात संपन्न
By Admin | Updated: March 9, 2015 09:33 IST2015-03-09T08:57:44+5:302015-03-09T09:33:15+5:30
घाटकोपरमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेली शिवरथ यात्रा ऊत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

घाटकोपरची शीवरथ यात्रा थाटात संपन्न
>ऑनलाइन लोकमत
घाटकोपर, दि. ८ - शहरात शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेली शिवरथ यात्रा ऊत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. ' एक घाटकोपर एक शिवरथ यात्रा ' समितीतर्फे ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. शिवनेरी ते घाटकोपर अशी ३२ युवकांनी दौड करत आणलेली 'शिव ज्योत' व 'छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी' हे या यात्रेचे वैशिष्ट्य होते. पक्ष भेद, मंडळ भेद विसरत हजारो युवक व नागरिकांनी या शिवरथ यात्रेमध्ये ऊत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
ढोल, ताशे, पोवाडे यांच्या गजरात वातावरण शिवमय झाले होते. या पदयात्रेत शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक, घोडे, रथ जनतेच्या आकर्षणाचा विषय ठरला. प्रत्येक चौकात या शिवरथ यात्रेचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. तसेच नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले. हजारो नागरिक असूनही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या ह्या रथयात्रेत अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठीत व्यक्तीही सहभाग घेतला होता.