पर्यटकांमुळे महामार्गावर कोंडी
By Admin | Updated: December 25, 2014 22:31 IST2014-12-25T22:25:09+5:302014-12-25T22:31:10+5:30
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो वाहनांनी लाखो पर्यटक कोकणात निघाले आहेत. यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली

पर्यटकांमुळे महामार्गावर कोंडी
वडखळ : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो वाहनांनी लाखो पर्यटक कोकणात निघाले आहेत. यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून हजारो वाहने रस्त्यावरच कोंडीत सापडली आहेत.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडले असून या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीत भरच पडलेली आहे. या खड्ड्यांमुळे वाहने नादुरूस्त होत असून वाहतूक कोंडी होते. नाताळ आणि थर्टीफर्स्टसाठी पर्यटकांची पसंती कोकणाला असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणांसह इतर राज्यातील पर्यटकांनी अलिबाग, मुरुडसह कोकण व गोव्याला पसंती दिली आहे. मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक मोठ््या प्रमाणात वाढली असून महामार्गावरील खड्ड्यातून उडत असलेल्या धुळीचा सामना वाहन चालक व प्रवाशांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडवितानाही वाहतूक पोलिसांना सध्या कसरत करावी लागत आहे.
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर करावे व महामार्गारील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक व पर्यटकांनी केली. (वार्ताहर)