Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे महामुंबईत AC लोकल फॉर्मात; मुंबईकरांना २३८ एसी लोकल मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:36 IST

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर संपूर्ण लोकल फेऱ्या एसी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयारी पूर्ण केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महामुंबईत वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा कल आता एसी लोकलकडे वळताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे. मार्चमध्ये अशी अवस्थता असून, मेपर्यंत सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत गर्दीत वाढ होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पश्चिम रेल्वेवरएसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमध्ये सरासरी १.५८ लाख होती, तर मार्चमध्ये सुमारे २.०५ लाख इतकी झाली. दर महिन्याला प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने फेऱ्यांमध्येदेखील वाढ करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या १० एसी लोकल माध्यमातून सध्या १३३ फेऱ्या चालवल्या जातात. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या २०२३ मध्ये ९६ फेऱ्या होत्या त्यामध्ये आता २८ टक्क्यांनी वाढ झाली असून येत्या काळात एसी लोकल मिळतील त्यानुसार सेवांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या काळात मुंबईकरांना २३८ एसी लोकल मिळणार 

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर संपूर्ण लोकल फेऱ्या एसी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार नवीन २३८ एसी लोकल खरेदीसाठी एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत सुमारे १९ हजार २९३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे.

अशी झाली फेऱ्यांमध्ये वाढ

वर्ष    मध्य रेल्वे     पश्चिम रेल्वे२०२३    ६६    ९६ २०२५    ८०    १०९ २०२६    ९४    १३३

एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे ही निश्चितच स्वागताची बाब आहे. मात्र, फेऱ्या वाढवाताना सद्यस्थितीत धावणाऱ्या एसी लोकल वेळेत चालवणे गरजेचे आहे. - प्रिया देशमुख, प्रवासी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Embraces AC Locals Amidst Rising Heat; 238 New Trains

Web Summary : With soaring temperatures, Mumbai sees increased AC local ridership. Passenger numbers surged in March, prompting more services. The city will soon get 238 new AC locals, costing ₹19,293 crore, to fully convert suburban lines, offering commuters much-needed relief from the heat.
टॅग्स :मुंबई लोकलएसी लोकलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वे