Join us

मुंबई विमानतळाचा सर्व्हर डाऊन, काम ठप्प झाल्याने प्रवाशांच्या रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 19:59 IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळी विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळी विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, यामुळे काही वेळातच प्रवाशांची मोठी गर्दी झाली. 

विमान तळावरील बॅगेज पॉईंटवर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे 40 ते 50 मिनिटे ही समस्या निर्माण झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि बॅगेज पॉईंटवर सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे. दुसर्‍या काउंटरद्वारे काम सुरू केले आहे. मुंबई विमानतळावर सेवा बंद का झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सायंकाळी प्रवाशांची संख्या जास्त असल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणात आणणे सीआयएसएफला अवघड होते.

यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.  सर्व्हर डाऊनमुळे गर्दी झाली होती. पण गर्दी व्यवस्थित हाताळली. परिस्थिती पाहता सर्व प्रवाशांनी चेक-इनसाठी जादा वेळ घ्यावा, असेही मुंबई विमानतळाने म्हटले आहे. 

टॅग्स :मुंबईविमानतळ