लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इराणविरुद्ध अमेरिका-इस्राइल संघर्षानंतर जाहीर झालेल्या युद्धविरामाचा सकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून, त्यामुळे ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारातही तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतासारख्या आयात-निर्भर देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या ‘एलपीजी’ पुरवठ्यातही सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
मुंबईतील हाॅटेल उद्योग हळूहळू पूर्वपदावर
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धविरामामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा मुंबईतील हॉटेल उद्योगाला होण्याची चिन्हे आहेत. पुढील काही आठवड्यांत परिस्थिती अधिक स्थिर झाल्यास या क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.
गॅस उपलब्धतेवर व्यवसायाचे गणित!
गॅस उपलब्धता सुधारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अन्नपदार्थ देणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता त्यांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा वडापाव, भजीपाव खाण्याचा आनंद घेता येऊ शकेल.
- मुंबईत या घडामोडींचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत गॅस टंचाई आणि वाढत्या दरांमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.
- अनेक लहान-मोठ्या हॉटेल्सना पर्यायी इंधन वापरण्याचा पर्याय स्वीकारावा लागला होता, ज्यामुळे खर्चात वाढ झाली होती. तर काही लहान हॉटेल्स गॅस सिलिंडर पुरवठाअभावी बंद होण्याच्या मार्गावर होती.
- अनेक प्रसिद्ध तसेच नाक्यानाक्यावरील वडापाव विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केल्याने मुंबईची ओळख असलेला वडापावही दुरापास्त झाला आहे. आता मात्र गॅस पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
- १०,००० पेक्षा अधिक संघटित रेस्टॉरंट्स
- १,४०,००० एकूण खाद्य स्टॉल, असंघटित आस्थापने (कॅफे, क्लाउड किचन, लहान फूड आउटलेट्ससह)
युद्ध थांबल्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही आता गॅस पाइपलाइनसाठी अर्ज करण्याच्या सूचना आल्याने, भविष्यात अपुऱ्या सिलिंडरचा प्रश्न भेडसावणार नाही, अशी अपेक्षा आहे.-हॉटेल व्यावसायिक, दादर
Web Summary : The ceasefire's positive impact on global markets is expected to benefit Mumbai's hotel industry. Lower gas prices could reduce costs, making food more affordable. Vada pav vendors and small hotels, struggling with gas shortages, anticipate relief and a return to normalcy.
Web Summary : युद्धविराम का वैश्विक बाजारों पर सकारात्मक प्रभाव पड़ने से मुंबई के होटल उद्योग को लाभ होने की उम्मीद है। गैस की कीमतें कम होने से लागत कम हो सकती है, जिससे भोजन अधिक किफायती हो सकता है। गैस की कमी से जूझ रहे वड़ा पाव विक्रेता और छोटे होटल राहत और सामान्य स्थिति में लौटने की उम्मीद कर रहे हैं।