कुत्र्याला उडविल्याने बेस्ट चालकाला अटक
By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-10T00:35:13+5:302014-07-10T00:35:13+5:30
दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथे बेस्टच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यू झाल्याने सदर बेस्ट बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

कुत्र्याला उडविल्याने बेस्ट चालकाला अटक
मुंबई : दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथे बेस्टच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यू झाल्याने सदर बेस्ट बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे.
24क् क्रमांकाची बेस्ट बस साईनगर येथून मार्गक्रमण करत असताना या मार्गावर अचानक एक कुत्र आला. या वेळी बस चालकाला बसवर नियंत्रण मिळविता आले नाही. परिणामी बेस्ट बसची कुत्र्याला धडक बसली. या धडकेत कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांनी याबाबतची माहिती ‘पावा’ या स्वयंसेवी संघटनेला कळविताच संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यावर प्रत्यक्षदर्शींसह स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकत्र्यानी एमएचबी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली.
एमएचबी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी यावर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिवाय कुत्र्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मागील आठवडय़ातील गुरुवारी ही घटना घडली होती. परंतु शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी बसचालक खरात यांच्यावर निष्काळजीपणो
बस चालवून कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
शिवाय त्यांना अटकही केली. नंतर मात्र खरात यांना जामिनावर मुक्त करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)