माहिती दडपल्याने केईएमला दणका
By Admin | Updated: November 15, 2014 01:39 IST2014-11-15T01:39:45+5:302014-11-15T01:39:45+5:30
माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणा:या केईएम रुग्णालयाला राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे.

माहिती दडपल्याने केईएमला दणका
मुंबई : माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणा:या केईएम रुग्णालयाला राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. केईएम रुग्णालय आणि जी. एस. मेडिकल महाविद्यालय आस्थापनेवरील कर्मचा:यांसाठी एकूण किती निवासस्थाने आहेत, यासह अन्य माहिती मागितली होती. मात्र प्रशासनाने ही माहिती उपलब्ध करून न दिल्याने तसेच या प्रकरणाच्या सुनावणीलाही गैरहजर राहिल्याने केईएमला माहिती आयुक्तांनी नोटीस बजावली आहे.
केईएमकडे महेश दळवी यांनी 16 जुलै रोजी माहिती अधिकारात अर्ज केला होता. सुरुवातीला ही माहिती देण्यास रुग्णालयाने नकार दिला. पुढे दळवींनी माहिती अधिका:याकडे पुन्हा अर्ज दाखल केला. त्या अर्जाची देखील दखल घेतली गेली नाही. अखेर त्यांनी या संदर्भातील अपील 4 ऑक्टोबर रोजी आयोगाकडे केले. माहिती आयोगाने त्याची तातडीने दखल घेतली. त्यावरील सुनावणीत मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी रुग्णालयाचे चांगलेच कान उपटले. ते म्हणाले, नियमानुसार अजर्दाराला 3क् दिवसांत माहिती देणो बंधनकारक आहे. विशिष्ट कारणास्तव अर्ज नाकारल्यास तसे अजर्दाराला कळवणोही कायद्यान्वये गरजेचे आहे. असे असतानाही केईएम रुग्णालयातील माहिती अधिका:याने दळवी यांच्या अर्जाकडे दुर्लक्षच केले.
दळवी यांच्या अर्जावरील सुनावणीला केईएम रुग्णालयाकडून कोणीही हजर नव्हते. याचीही गंभीर दखल घेत मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांनी याचा सविस्तर खुलासा करण्याचे आदेश केईएमला दिले आहेत. तसेच अजर्दाराने मागवलेल्या माहितीसंबंधीचे सर्व कागदपत्रंचे निरीक्षण करण्याची संधी द्यावी व त्यांना हवी असलेली आणि उपलब्ध असलेली माहिती आवश्यक वाटल्यास अधिका:यांशी समन्वय साधून 9 डिसेंबर 2क्14 च्या आत द्यावी, असेही माहिती आयुक्तांनी नोटिशीत नमूद केले.