स्टंटबाजी करणा-या दोन प्रवाशांच्या चुकीमुळे हार्बरवरील १५ लोकल रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:16 IST2017-10-25T06:16:43+5:302017-10-25T06:16:48+5:30

मुंबई : स्टंटबाजी करणा-या दोन प्रवाशांच्या चुकीमुळे तब्बल १५ लोकल फे-या रद्द होऊन, ५० लोकल फे-यांना लेटमार्क लागल्याची घटना हार्बर मार्गावर सोमवारी घडली.

Due to the stumbling of two stabbing passengers, 15 local residents on the cancellation canceled | स्टंटबाजी करणा-या दोन प्रवाशांच्या चुकीमुळे हार्बरवरील १५ लोकल रद्द

स्टंटबाजी करणा-या दोन प्रवाशांच्या चुकीमुळे हार्बरवरील १५ लोकल रद्द

मुंबई : स्टंटबाजी करणा-या दोन प्रवाशांच्या चुकीमुळे तब्बल १५ लोकल फे-या रद्द होऊन, ५० लोकल फे-यांना लेटमार्क लागल्याची घटना हार्बर मार्गावर सोमवारी घडली.
गाडीच्या छतावरून प्रवास करणे धोक्याचे आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येते. मात्र, काही तरुण स्टंट करण्याच्या नादात असे प्रकार करताना सर्रास दिसतात. सोमवारी रात्री हार्बर मार्गावर उशिरा छतावरून प्रवास करताना, ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे ४० मिनिटे हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे रात्री घरी परतणाºया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या दुर्घटनेनंतर १५ लोकल फेºया पूर्णत: रद्द करण्यात आल्या. ५० लोकल फेºया उशिराने सुरू होत्या.

Web Title: Due to the stumbling of two stabbing passengers, 15 local residents on the cancellation canceled