बंदमुळे पेट्रोल पंपांवर कोंडी
By Admin | Updated: August 26, 2014 01:42 IST2014-08-26T01:42:24+5:302014-08-26T01:42:24+5:30
पेट्रोल पंप चालकांकडून वसूल करण्यात येणारा एलबीटी पाच टक्क्यांवरून ०.१ टक्के करावा, एसएससीच्या अधिभारापोटी प्रति लीटरमागे अडीच रुपये वसूल केले जातात ते वसूल करणे बंद करावे

बंदमुळे पेट्रोल पंपांवर कोंडी
जितेंद्र कालेकर, ठाणे
पेट्रोल पंप चालकांकडून वसूल करण्यात येणारा एलबीटी पाच टक्क्यांवरून ०.१ टक्के करावा, एसएससीच्या अधिभारापोटी प्रति लीटरमागे अडीच रुपये वसूल केले जातात ते वसूल करणे बंद करावे, अशा तीन मुख्य मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या भीतीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच वाहनचालकांनी दिवसभर पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केल्यामुळे पंपाच्या परिसरात लांबच लाब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीचे चित्र निर्माण झाले होते.
पेट्रोल पंप असोसिएशनचे ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे सचिव केयूर पारिख यांनी दिलेल्या माहितीनुसार एसएससीच्या अधिभारापोटी राज्यातून वर्षाला २५०० कोटी रुपये प्रति लीटर पेट्रोलमधून अडीच रुपये वसूल केले जातात. महाराष्ट्राच्या बाहेरही क्रूड रिफायनरीचा कच्चा माल जात असताना या मालाच्या अधिभारापोटी हे पैसे भरावे लागतात. ते पूर्णपणे रद्द करण्यात यावेत. व्हॅटचा दरही महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आहे. तोही कमी करावा. या मागण्या मान्य झाल्या तर वाहनचालकांना लीटरमागे सहा ते सात रुपये कमी पडणार आहेत. त्यामुळे हा संप पुकारण्यात आला होता.
हा संप बेमुदत असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील २५० तर रायगडमधील १३१ आणि ठाणे शहरातील १२ पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती. ठाण्यातील तीन पेट्रोल पंपांवर दुपारनंतर शेकडो वाहनचालकांनी एकच गर्दी केली होती.