प्रदूषणामुळे मिठागरे अडचणीत

By Admin | Updated: April 27, 2015 22:43 IST2015-04-27T22:43:48+5:302015-04-27T22:43:48+5:30

येथील झोपडपट्टी परिसरातून नाल्यात टाकण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे पश्चिमेकडील पाचूबंदर समुद्र किनारी असलेली मिठागरे शेवटच्या घटका मोजत आहेत.

Due to pollution, sweet water troubles | प्रदूषणामुळे मिठागरे अडचणीत

प्रदूषणामुळे मिठागरे अडचणीत

दीपक मोहिते ल्ल वसई
येथील झोपडपट्टी परिसरातून नाल्यात टाकण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे पश्चिमेकडील पाचूबंदर समुद्र किनारी असलेली मिठागरे शेवटच्या घटका मोजत आहेत. याचा तीरांवरही परिणाम होत आहे. मानवनिर्मित असलेल्या या संकटाला महानगरपालिका प्रशासनाने त्वरित थांबवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मीठ उत्पादकांनी केली आहे.
वसई-विरार उपप्रदेशामध्ये तिवरांची कत्तल, पाणीवाहून नेणाऱ्या नाल्याची रुंदी कमी करणे असे प्रकार सतत घडत आहे. मागील काही वर्षात नायगाव परिसरात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. परंतु आजवर एकावरही कारवाई झाली नाही.

मिठागरे नष्ट?
४वसई पाचूबंदर येथे शासकीय गोदामामागे असलेल्या झोपडपट्टीतून जवळच्या नाल्यात घातक रसायने टाकली जात आहे. यामुळे परिसरातील तिवरे नामशेष होत आहेत. तर नाल्यातील पाण्याचा रंगही बदलत आहे. नाल्यातील पाणी आसपासच्या परिसरातील मिठागरांमध्ये जाऊन मीठाच्या आगरांना धोका निर्माण झाला आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास ते नामशेष होण्याची शक्यता असून पर्यावरणाचा ऱ्हासही होईल, अशी भीती स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Due to pollution, sweet water troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.