पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:11+5:302014-09-26T21:40:11+5:30

फोटो मेलवर आहेत.....

Due to police alert, the rape attempt of the girl is unsuccessful | पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

टो मेलवर आहेत.....
........................................

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला
कुर्ल्यातील घटना, बचावासाठी आारोपीची नाल्यात उडी

मुंबई: क्लासेसवरुन घरी परतणार्‍या २३ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. नेहरुनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला असून २०१० मध्ये याच परिसरात झालेल्या सीरिअल बलात्कारामध्ये देखील याच आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चेंबूरच्या सुमन नगर येथे राहणारी ही तरुणी एम एच्या दुसर्‍या वर्षाला शिकत आसून तिचे वडील सहार विमानतळावर सीमाशुल्क् विभागात अधिकारी आहेत. बुधवारी ती चुनाभ˜ी येथील एटीआयमध्ये फिल्डवर्क केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतत होती. चुनाभ˜ी ते सुमननगर हे १० मिनिटांचे अंतर आहे. मात्र मध्येच सायन-पनवेल मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यामुळे शॉर्टकट रस्त्याने ती कुर्ल्याच्या शिवसृष्टी परिसरातून येत होती. दरम्यान येथील गणेश मंदिरांच्या बाजूला एका झुडूपातून अचानक तिच्यावर महादेव कौंडर (४५) या आरोपीने झडप घातली. कौंडरने तिला गवतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरोपीला विरोध केला. मात्र त्याने तिचे दोन्ही हात पकडून एका हाताने तोंड दाबले. त्यामुळे तिला आरडाओरडा देखील करता येत नव्हता. काही वेळानंतर तरुणीने त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मोठी झटापट केली. याच दरम्यान आरोपीने तिच्या तोंडावरील हात काढला. हीच संधी साधत तरुणीने आरडाओरडा सुरु केला.
नेहरु नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजीवन खामकर हे याच दरम्यान परिसरातर गस्त घालत होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीने खामकर यांना पाहताच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी या आरोपीने बाजूलाच असलेल्या नाल्यात उडी घेतली. खामकर हे एकटेच असल्याने आरोपीला पकडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी विलास दरेकर आणि बाळासाहेब वळुंज या दोन सहकार्‍यांना या घटनेबाबत फोनवर माहिती दिली. दोघांनी देखील त्या ठिकाणी धाव घेत या आरोपीला रोखून ठेवले. त्यानंतर अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने आरोपीला बाहेर काढले.
नेहरु नगर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. मात्र २०१० मध्ये कुर्ल्यातील नेहरु नगर परिसरात सलग तीन लहान मुलींवर बलात्कार होऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये केवळ एकच गुन्हात आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप या दोन गुन्हयामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे यामध्ये या आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी या आरोपीची डीएनए चाचणी करण्याचे ठरवले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
...............................................

Web Title: Due to police alert, the rape attempt of the girl is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.