Join us  

अभ्यास केला नाही म्हणून चिमुरडीचे डोके बाकावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 4:30 AM

अभ्यास केला नाही, म्हणून ६ वर्षीय चिमुरडीचे डोके बाकावर आपटून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबोलीत मंगळवारी घडला. अंबोली पोलिसांनी मौलाना मुजाहिदविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : अभ्यास केला नाही, म्हणून ६ वर्षीय चिमुरडीचे डोके बाकावर आपटून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबोलीत मंगळवारी घडला. अंबोली पोलिसांनी मौलाना मुजाहिदविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.जोगेश्वरी परिसरात २७ वर्षीय तक्रारदार महिला पती आणि ६ वर्षांच्या मुलीसोबत राहते. मुलीला धार्मिक शिक्षणासाठी त्यांनी घराजवळील मेमन कॉलनी येथील मौलाना मुजाहिद यांच्याकडे पाठविले. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे गेली. मात्र, अभ्यास केला नसल्याच्या रागातून शिक्षा म्हणून मुजाहिद यांनी मुलीचे डोके बाकावर आपटून तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या डोळ्याखाली जखम झाली आहे.हा प्रकार तिच्या आईला समजताच, त्यांच्या नातेवाइकाने मुजाहीत यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर रात्री अंबोली पोलीस ठाणे गाठून त्यांनी याबाबत तक्रार केली. त्यानुसार, अंबोली पोलिसांनी मुजाहिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी