पालिकेच्या धुरामुळे मेट्रो स्थानकात गोंधळ
By Admin | Updated: August 6, 2014 03:12 IST2014-08-06T03:12:19+5:302014-08-06T03:12:19+5:30
पावसाळ्यात डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांना आळा बसावा म्हणून पालिकेकडून ठिकठिकाणी करण्यात येणा:या धूरफवारणीमुळे मेट्रोच्या घाटकोपर स्थानकात काही मिनिटांकरीता गोंधळ उडाला.

पालिकेच्या धुरामुळे मेट्रो स्थानकात गोंधळ
मुंबई : पावसाळ्यात डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांना आळा बसावा म्हणून पालिकेकडून ठिकठिकाणी करण्यात येणा:या धूरफवारणीमुळे मेट्रोच्या घाटकोपर स्थानकात काही मिनिटांकरीता गोंधळ उडाला. फवारणीचा धूर मेट्रो स्थानकात येताच फायर अलार्म वाजले आणि स्थानकातील यंत्रणा बंद झाली.
सकाळी 9.40 च्या सुमारास घाटकोपर स्थानकाखालून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे स्थानकातील फायर अलार्म वाजू लागले. त्यामुळे स्थानकात कार्यरत असलेल्या मेट्रो कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणोची एकच धावपळ झाली. स्थानकातच पळापळ झाल्याने प्रवाशांना काही समजत नव्हते. घाटकोपर स्थानकातील सरकते जिन्यांसह इतर यंत्रणा आपोआप बंद झाली.
यामुळे घबराट पसरलेल्या प्रवाशांना मेट्रो प्रशासनाने कुठलीही गंभीर घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आणि पाच मिनिटांत पुन्हा सर्व यंत्रणा आपोआप सुरू झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. फायर अलार्म वाजल्याने तात्काळ अग्शिनमन दलाची गाडीही या ठिकाणी पोहोचली होती. (प्रतिनिधी)