Join us  

मेट्रोमुळे पावसात पाणी तुंबणार नाही!, प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 3:09 AM

मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी संबंधित प्राधिकरणांनी घ्यावी, असे महापालिकेने ठणकावताच या प्राधिकरणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी संबंधित प्राधिकरणांनी घ्यावी, असे महापालिकेने ठणकावताच या प्राधिकरणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वीच आपले म्हणणे मांडत प्राधिकरणाच्या कामांमुळे कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घेत असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही मेट्रो-३ या भुयारी मार्गाच्या कामादरम्यान मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केला आहे.मुंबई मेट्रो-३ चे सर्व अभियंते, कंत्राटदारांना पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनांबद्दल निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो-३ च्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अभियंत्यांसमवेत मुंबई मेट्रो ३ च्या बांधकाम स्थळांना संयुक्त भेटी दिल्या आहेत. मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली मेट्रोच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदारांनी मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. सर्व कामे प्रगतिपथावर आहेत.पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती पूर्ण होतील. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढून टाकणे तसेच कॅच पिट्स बांधणे अशा कामांचा यात समावेश आहे....ही घेणार खबरदारीमेट्रो-३ च्या प्रत्येक स्थानकामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्सूनदरम्यान विद्युतीय व संचार व्यवस्था कायम राखण्यासाठी इतर यंत्रणांशी समन्वय साधला जाईल.बांधकाम स्थळावर जमा होणाºया मलब्याचा निचरा डम्पर्सद्वारे करण्यात येईल.मान्सूनदरम्यान बांधकाम स्थळी साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल.दोन अभियंते व पर्यवेक्षक असलेली आपत्कालीन प्रतिसाद चमू प्रत्येक बांधकाम स्थळावर २४ तास तैनात राहील.महानगरपालिकेचे स्थानिक कार्यालय आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी दररोज समन्वय साधला जाईल. मान्सूनसंबंधी तक्रारी नोंदविण्याकरिता कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात येईल.पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये यासाठी दिशादर्शकांची पुन: रंगरंगोटी करणे, बॅरिकेड्स स्वच्छ करून दृश्यमानता वाढविणे, कामाच्या आजूबाजूचे रस्ते सुस्थितीत ठेवणे यांसारखी कामे सुरू असून ती ३१ मेपर्यंत पूर्ण होतील.मेट्रो ३ च्या बांधकामामुळे गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही पालिकेशी समन्वय साधत आहोत. पूर प्रवण भागात सर्व प्रकारची आपत्कालीन उपकरणे आणि वाहने उपलब्ध राहतील. वाहतूक किंवा पाणी तुंबण्यासंबंधित कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.- अश्विनी भिडे, संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

टॅग्स :मुंबईमेट्रो