विषय समिती सदस्यत्वामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर

By Admin | Updated: May 22, 2014 04:23 IST2014-05-22T04:23:10+5:302014-05-22T04:23:10+5:30

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सहा विषय समितीच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया बुधवारी पालिका सभागृहात घेण्यात आली.

Due to the membership of the Sub-Committee of the Nationalist Congress Party | विषय समिती सदस्यत्वामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर

विषय समिती सदस्यत्वामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या सहा विषय समितीच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया बुधवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. सदस्यांमधूनच सभापतीची निवड होणार असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी आघाडीसह युतीने काही नगरसेवकांना समित्यांमधून वगळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांमध्ये या समिती सदस्यत्वावरुन नाराजीचा सूर उमटला आहे. बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला बाल कल्याण, शहर नियोजन आणि शिक्षण समिती या सहा समितीच्या सदस्यपदासाठी हीनिवड प्रक्रिया घेण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आणि मनसे या महाआघाडीच्याने प्रत्येक समितीवर ८ तर युतीच्यावतीने सात सदस्य देण्यात आले. गेल्या चार निवडणुकांमध्ये झालेल्या बंडखोरीतून बोध घेऊन यंदा आघाडीने काही नगरसेवकांना प्रमुख समितीतून बाहेर ठेवल. तर काही बंडखोर नगरसेवकांना केवळ शिक्षण समितीमध्येच घेतले आहे. सदस्यांची नावे हे गटनेते देणार असल्याने नगरसेवकांना या निवड प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करता आला नाही. मात्र निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नगरसेवकांनी आपला राग गटनेत्यांकडे व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या वंदना पाटील यांना त्यांच्याच पक्षातील काही नगरसेवकांनी अर्वाच्च शब्दात सुनावले. तर दुसरीकडे मनसेच्या नगरसेवकांमध्येही सभापतीपदावरुन नाराजीचा सुर उमटला़ पक्षाचे चार नगरसेवक नाराज असल्याने महाआघाडीला ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. सभापतीपदासाठी बांधकाम समितीसाठी काँग्रेसचे प्रदिप पाटीलख तर पाणीपुरवठा समितीसाठी मनसेचे कुणाल भोईर, आरोग्य समितीसाठी राष्ट्रवादीच्या वंदना पाटील, शहर नियोजन समितीवर मनसेचे संदिप लकडे आणि महिला बालकल्याण समितीवर रिपाइंच्या सुधा नरेश गायकवाड यांची नावे चर्चेत आहे. तर शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती उपनगराध्यक्ष असल्याने यासाठी निवडणूक होणार नाही. आघाडीकडे सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांचे सभापती निश्चित मानले जात आहे.

Web Title: Due to the membership of the Sub-Committee of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.