मुसळधार पावसामुळे मुंबई खड्ड्यांत
By Admin | Updated: August 2, 2014 02:21 IST2014-08-02T02:21:08+5:302014-08-02T02:21:08+5:30
मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत मुंबईत तब्बल २८२ खड्डे वाढले आहेत़ मात्र पाऊस सतत कोसळत असल्याने खड्डे भरण्याचे कामही मंदावले

मुसळधार पावसामुळे मुंबई खड्ड्यांत
मुंबई : मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत मुंबईत तब्बल २८२ खड्डे वाढले आहेत़ मात्र पाऊस सतत कोसळत असल्याने खड्डे भरण्याचे कामही मंदावले असून, याचा फटका वाहतुकीला बसतो आहे़ त्यामुळे मुंबईकरांची गैरसोयही वाढली आहे़
मुंबईतील प्रत्येक नाक्यावरच्या खड्ड्याची नोंद होऊन तो वेळेत भरला जाण्यासाठी पालिकेने २०११मध्ये स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले़ मात्र याचबरोबर विभागातील अभियंत्यांनीही रस्त्यावर उतरून खड्ड्यांची नोंद घेणे अपेक्षित होते़ मात्र खड्डे पाहणी सोडाच, पण दाखल झालेल्या तक्रारींचीही अधिकारी दखल घेत नसल्याचा सूर नागरिकांनी लावला आहे़
खड्ड्यांची तक्रार येताच विभागातील अभियंत्यांनी संबंधित ठेकेदारामार्फत ४८ तासांमध्ये खड्डे बुजवून घेणे अपेक्षित आहे़ मात्र खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे अपवादानेच दिसून येते़ (प्रतिनिधी)