वाढीव चटईक्षेत्र देताना दुजाभाव

By Admin | Updated: June 16, 2015 01:01 IST2015-06-16T01:01:19+5:302015-06-16T01:01:19+5:30

स्वत: निर्माण केलेल्या मात्र काही वर्षांतच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय देऊ करणाऱ्या सिडकोने सामाजिक उपक्रमांसाठी

Due to giving extended area of ​​fertility | वाढीव चटईक्षेत्र देताना दुजाभाव

वाढीव चटईक्षेत्र देताना दुजाभाव

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
स्वत: निर्माण केलेल्या मात्र काही वर्षांतच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय देऊ करणाऱ्या सिडकोने सामाजिक उपक्रमांसाठी दिलेल्या भूखंडांना वाढीव चटईक्षेत्र देताना मात्र आखडता हात घेतला आहे. सिडकोच्या या दुजाभावामुळे शहरातील अनेक शाळा, हॉस्पिटल्स आणि समाजमंदिरांच्या पुनर्बांधणीला खो बसला आहे.
शहराची निर्मिती करताना भूखंडावर उभारण्यात आलेल्या बहुतांशी इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. तर बदललेल्या परिस्थितीत काहींना इमारतींचा विस्तार करणे गरजेचे झाले आहे. या इमारती उभारताना एक चटई निर्देशांक वापरण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक चटई निर्देशांक मिळावा यासाठी काही संस्था चालकांनी सिडकोकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र नियमावर बोट ठेवत सिडकोने वाढीव चटईक्षेत्र देण्यास असमर्थता दर्शविली आहे. सिडकोने वाढीव चटईक्षेत्र देण्याबाबत अलीकडेच धोरण निश्चित केले आहे.
सिडकोने नव्या धोरणानुसार २ चटईक्षेत्रासाठी २0 मीटर रुंदीचा रस्ता तर दीड एफएसआयसाठी १५ मीटरचा रस्ता असणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे हे भूखंड तीस-पस्तीस वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. हे भूखंड देताना रस्त्यांचे नियोजनसुध्दा सिडकोनेच केले. बहुतांशी ठिकाणी १0 ते १२ मीटर रुंदीचे रस्ते आहेत. वाढीव चटईक्षेत्राबाबत तयार केलेली नियमावली या संस्था चालकांना जाचक ठरत आहे. तर दुसरीकडे अल्पवधीतच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मंजूर केला आहे. त्यासाठी ९ मीटर रुंदीच्या रस्त्याची अट आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या जीडीसीआरमध्ये वाढीव एफएसआयसाठी रस्त्याच्या रूंदीची कोणतीही अटक घातली नाही. यावरून सिडकोने स्वत:च्या नियमावलीला बगल दिल्याचे दिसते.

Web Title: Due to giving extended area of ​​fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.