दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली
By Admin | Updated: February 6, 2016 11:04 IST2016-02-06T09:09:21+5:302016-02-06T11:04:24+5:30
मुंबईत पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली असून मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू आहे.

दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - मुंबईत आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली असून त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही दिसून आला. दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते मुंब्रा स्थानकापर्यंत एवढे दाट धुके होते की समोरील व्यक्ती दिसणेही शक्य नव्हते मुंब्र्याच्या पुलाचा भाग धुक्यामुळे पूर्णपणे दिसेनासा झाला होता. पश्चिम रेल्वेवरही तीच गत असून तेथील गाड्याही १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.