मद्यधुंद टीसीमुळे ‘राजधानी’त महिला प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: August 8, 2014 02:32 IST2014-08-08T02:32:08+5:302014-08-08T02:32:08+5:30
तिकीट तपासणीबरोबरच गैरसोयींतून प्रवाशांची सुटका करण्याची जबाबदारी असणा:या टीसीच्या कामचुकाराचा फटका प्रवाशांना बसल्याची घटना गुरुवारी घडली.

मद्यधुंद टीसीमुळे ‘राजधानी’त महिला प्रवाशांचे हाल
>मुंबई : तिकीट तपासणीबरोबरच गैरसोयींतून प्रवाशांची सुटका करण्याची जबाबदारी असणा:या टीसीच्या कामचुकाराचा फटका प्रवाशांना बसल्याची घटना गुरुवारी घडली. राजधानी एक्स्प्रेसमधून सामान चोरीला गेल्यावर मदत मागणा:या दोन महिला प्रवाशांना टीसीकडून कुठलीही मदत मिळली नाही. कारण तोच मद्यधुंद अवस्थेत होता !
या टीसीविरोधात तक्रार ऐकून घेण्याऐवजी स्टेशन मास्तरांकडून महिला प्रवाशांना अशा घटना नेहमीच घडत असल्याचे सांगत एक अजबच ज्ञान देण्यात आले.
बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास राजधानी एक्स्प्रेस दिल्लीहून सुटली. या ट्रेनच्या थर्ड एसी असलेल्या बर्थ सातमधून मुंबईच्या सत्या राजमोहन (45) आणि बर्थ 49 मधून नीता बोरकर या दोघी प्रवास करत होत्या.
ही ट्रेन सुरत दरम्यान आली असता सत्या यांना आपले सामानच जागेवर नसल्याचे
दिसले. तर नीता बोरकर यांचेही सामान चोरीला गेले होते. त्यावेळी या दोघींनीही आरडाओरड केली असता डब्यातील अन्य प्रवासी मदतीसाठी धावून आले. मात्र टीसीच जागेवर नसल्याचे आढळले. त्याला बोलावण्यासाठी अन्य प्रवाशांनी धावपळ केली असता सूर्यकुमार परिहार नावाचे टीसी पेन्ट्रीकारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळले.
परिहार यांनी काही ऐकून घेण्यास नकार
देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून कुठलीही मदत मिळत नाही. ही ट्रेन मुंबई सेन्ट्रल येथे येताच चोरीची माहीती स्टेशन मास्तरांना देण्यात आली. मात्र ‘अशा घटना होत असल्या’चे अजब ज्ञान त्यांनी या महिला प्रवाशांना देण्यात आले.
त्यानंतर या महिला प्रवाशांनी आपला
मोर्चा जीआरपीकडे (रेल्वे पोलिस) तक्रार
दाखल केली. याबाबत मुंबई सेन्ट्रल जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेन्द्र त्रिवेदी
यांनी सांगितले की, टीसीने कामात तत्परता दाखवली असती तर ही घटना रोखता आली असती. याची तक्रार दाखल करून घेण्यात
आली आहे. (प्रतिनिधी)
घटना रोखता आली असती
टीसीने कामात तत्परता दाखवली असती तर ही घटना रोखता आली असती. याची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. बोरकर यांचे 38 हजार रुपये किमतीचे तर सत्या राजमोहन यांचे 20 हजार रुपये किमतीचे सामान चोरीला गेल्याचे मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.
टीसीने केली बेशुद्घावस्थेतील प्रवाशांना मदत
दुसरीकडे एका घटनेत टीसीची कामातील तत्परता दिसून आली आहे. कोकण मार्गावर धावणा:या मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणा:या एकाच कुटुंबातील तीन जणांना एका टोळीने गुंगीचे औषध देऊन लुटल्यानंतर टीसीने सर्वोपरी मदत केली. - वृत्त/3