Join us

एअर इंडियाच्या विमानामुळे चार तास झाला प्रवाशांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 18:53 IST

एअर इंडियाच्या एआय 809 विमानाने दिल्लीला जाणा-या प्रवाशांचे शनिवारी चांगलेच हाल झाले.

मुंबई, दि. 5 - एअर इंडियाच्या एआय 809 विमानाने मुंबईहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांचे शनिवारी चांगलेच हाल झाले. विमानात तांत्रिक बिघाड उदभवल्याने प्रवासी तीन ते चार तासांसाठी विमानात अडकून पडले होते. यावेळी विमानातील एअर कंडिशनिंगची यंत्रणाही बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. विमानातील प्रवाशांनीच ही माहिती दिली. 

शनिवारी दुपारी ही घटना घडली. मुंबई-दिल्ली-जेद्दाह विमानाला नेमका का विलंब झाला. त्याची काय कारणे आहेत हे शोधण्यासाठी आम्ही चौकशी समिती स्थापन केली आहे असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.