सिडकोच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीत ‘कॅम्पाकोला’

By Admin | Updated: March 15, 2015 00:16 IST2015-03-15T00:16:02+5:302015-03-15T00:16:02+5:30

मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीप्रमाणे सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कळंबोली सेक्टर २०मधील प्लॉट ५ वर उभारलेल्या इमारतीत संबधित बिल्डरने बेकायदा चार मजले उभारले आहे.

Due to CIDCO's ignorance, the Camppola in Kalamboli | सिडकोच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीत ‘कॅम्पाकोला’

सिडकोच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीत ‘कॅम्पाकोला’

तळोजा : मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीप्रमाणे सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कळंबोली सेक्टर २०मधील प्लॉट ५ वर उभारलेल्या इमारतीत संबधित बिल्डरने बेकायदा चार मजले उभारले आहे.
या इमारतीचे गेल्या काही वर्षांपासून काम सुरू होते. सिडको प्रशासनाने बांधकाम परवानगी विभागाने दिलेल्या पत्रानुसार या इमारतीसाठी तळमजल्यासह १४ मजल्यांची परवानगी देण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत या इमारतीवर १८ मजल्यांचे बांधकाम झाले असून परवानगी नसतानाही वरील ४ मजल्यांचे बांधकाम संबधित बिल्डरने कोणाच्या आर्शिवादाने केले हा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीचे एकूण क्षेत्रफळ २५०९.४४७ चौरस मीटर असून तळमजल व १४ मजल्यांवर ५२ सदनिका आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र १८ मजल्यांचे बांधकाम झाले असून यात ६८ सदनिका आहेत. सर्वात वरील चार मजल्यावर प्रत्येकी ४ सदनिकाप्रमाणे एकूण १६ सदनिका अनधिकृत असून यात कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे. विशेष म्हणजे या इमारतीतील १४ मजल्यापर्यंत अधिकृतपणे रहाणाऱ्या सदनिकाधारकांना अद्याप घराचा ताबा पत्र (ओसी) मिळालेले नाही.
या इमातीला १८ मजल्यापर्यंत वीज, पाणी जोडणी मिळाली असून यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधीत इमारतीत परवानगी नसतानाही बिल्डरने तळमजल्यावर मोठया प्रमाणात व्यावसायिक गाळे बांधले आहेत. यावर प्रशासन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे समजते. नवी मुंबईत अनेक ठिकाणावर बिल्डर लॉबीने प्रशासनाला आपल्या जाळ्यात अडकवून अनधिकृत मजले चढवल्याची शक्यता आहे. नगर रचनाकार विभागाने बांधकाम परवानगी पत्राच्या आधारे (ओसी) वस्तूस्थिती जाणून न घेतल्याने बिल्डर अनधिकृत घरे ग्राहकांच्या माथी मारत आहेत. (वार्ताहर)

च्बांधकाम परवानगी पत्राच्या (विरूध्द) सदर जागेत वाढीव अनधिकृत बांधकाम आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे सिडको नगररचना अधिकारी(बांधकाम परवानगी विभाग) मंजुळा नायक यांनी सांगितले.
च्आमच्या जागेचा एफएसआय शिल्लक आहे. लवकरच प्रकाराचे निवारण होईल असे बांधकाम व्यवसायिक करसन पटेल याने सांगितले.

Web Title: Due to CIDCO's ignorance, the Camppola in Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.