भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य जखमी

By Admin | Updated: December 20, 2015 00:52 IST2015-12-20T00:52:36+5:302015-12-20T00:52:36+5:30

भरधाव कारच्या धडकेत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली आहे. विनापरवाना कार चालवित

Due to a car crash | भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य जखमी

भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य जखमी

मुंबई : भरधाव कारच्या धडकेत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली आहे. विनापरवाना कार चालवित असलेला आरोपी तरुण, हा नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील आमदारांचा नातेवाईक असल्याने त्याच्या बचावासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले. मात्र, अखेर वरिष्ठांच्या आदेशाने आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
मधुबाई ढोलकीया (४०) आणि विनोद ढोलकीया हे दाम्पत्य या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर मुलुंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलुंड पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला. फोर्ड कारमधून भरधाव वेगाने निघालेल्या अल्पवयीन तरुणाचा कारवरचा ताबा सुटल्याने गाडी तेथील दुभाजकाला धडकली. या अपघातात सायकलवरून पूर्वेकडे येण्यास निघालेले ढोलकीया दाम्पत्य गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने मुलुंडच्या सावरकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने मधुबाई यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या नवघर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. भिवंडी येथील रहिवासी असलेला हा तरुण नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्राच्या आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नगरसेवकासह राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यातील एका कार्यकत्याने गाडीची नंबर प्लेट लपविण्याचा प्रयत्न केला, तर राजकीय दबावामुळे नवघर पोलिसांनी माहिती देण्यास कमालीची गुप्तता बाळगली होती. अखेर वरिष्ठांना ही बाब समजताच, रात्री उशिरा त्यांच्या आदेशान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा तरुण विनापरवाना कार चालवत होता. त्याने मद्याचे सेवन केले होते की नाही? याबाबत पोलीस माहिती दिलेली नाही.

Web Title: Due to a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.