ओसरगावात अपघात; एक ठार, १२ जखमी

By Admin | Updated: December 25, 2014 00:01 IST2014-12-24T23:58:43+5:302014-12-25T00:01:28+5:30

दुधाचा टेम्पो, टेम्पो ट्रॅव्हलरची धडक

Due to accident in Osargaon; One killed, 12 injured | ओसरगावात अपघात; एक ठार, १२ जखमी

ओसरगावात अपघात; एक ठार, १२ जखमी

कणकवली : महामार्गावर ओसरगाव विठ्ठल मंदिरानजीक दुधाचा टेम्पो आणि टेम्पो ट्रॅव्हलरची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक महिला ठार झाली, तर बाराजण जखमी झाले. जखमींना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅन्थोनी किसन साळवे (वय ४७, रा. खारपूर्व, मुंबई) यांनी पोलिसात अपघाताची माहिती दिली.
या अपघातात ट्रॅव्हलरमधील सुशीला मार्शल आडाव (५७, रा. पुणे, वडगाव शेरी) या गंभीर जखमी महिलेचा ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आज, बुधवारी सकाळी ९.३० वाजता हा अपघात झाला. अ‍ॅन्थोनी साळवे एकवीरा ट्रॅव्हल्सच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून (एम एच ४३-एच-७९९९) प्रवाशांना घेऊन पुणे येथून गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये जात होते. ओसरगाव, कानसळीवाडी येथे विठ्ठल मंदिरानजीक समोरून येणाऱ्या कृष्णा दूध घेऊन जाणाऱ्या टेम्पोची (एम एच-१०-झेड-२५१३) ट्रॅव्हलरला धडक बसली. अपघातात दूध वाहून नेणाऱ्या टेम्पोची मागील चासी तुटून पडली.
अपघातात मोरेश्वर किशोर कोळी (५५,रा. धारावी, मुंबई) हे गंभीर जखमी झाले. तर रावसाहेब जनार्दन वासतळे (५३, लोणावळा), थॉमस ठोंबरे (४७), विद्या अ‍ॅन्थोनी सावले (४२), प्रतीक्षा थॉमस ठोंबरे (१४, पुणे), सिमोना राजू पंडित (९, रा. लोणावळा), संगीता महेश विसावर्या (३७, मुंबई), शंकना राजू पंडित (४०, लोणावळा), महेश डेव्हीड आवरिया (६२, पुणे), विनोद आनंद वायवंडे (३०, इस्लामपूर), विलास बाळू माने (४०, इस्लामपूर), संभाजी दादू कोंडे (५०) हे जखमी झाले.
जखमींना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to accident in Osargaon; One killed, 12 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.