मुंबईत डीटीएच ग्राहकांमध्ये वाढ !

By Admin | Updated: May 18, 2015 22:54 IST2015-05-18T22:54:23+5:302015-05-18T22:54:23+5:30

मुंबई शहरात डीटीएच ग्राहकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ४० हजार ग्राहकांची वाढ झाली आहे.

DTH subscribers rise in Mumbai! | मुंबईत डीटीएच ग्राहकांमध्ये वाढ !

मुंबईत डीटीएच ग्राहकांमध्ये वाढ !

चेतन ननावरे ल्ल मुंबई
मुंबई शहरात डीटीएच ग्राहकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ४० हजार ग्राहकांची वाढ झाली आहे. मुंबई शहरात मार्च २०१५ अखेरपर्यंत एकूण
एक लाख ९० हजार ५३२ डीटीएच ग्राहकांची नोंद करण्यात आली. त्यातील टाटास्कायचा वापर करणाऱ्यांची संख्या १ लाख २३ हजार ९५ इतकी म्हणजेच सुमारे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे
स्पष्ट होते. त्याखालोखाल व्हिडीओकॉन, डिश टीव्ही आणि एअरटेलचा समावेश आहे. रिलायन्स आणि सन टीव्ही या स्पर्धेत कुठेही दिसत नाहीत.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत एकूण डीटीएच ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असताना काही कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आले. २०१२-१३ मध्ये रिलायन्सकडे ८ हजार ७९७ ग्राहक होते. मात्र
२०१४-१५ मध्ये त्यातील निम्म्याहून अधिक ग्राहकांत घट होऊन केवळ ४ हजार ६२४ ग्राहक उरले आहेत. डिश टीव्हीलाही गळती लागल्याने दोन वर्षांपूर्वी असलेल्या २० हजार
७९१ ग्राहकांमधील आता केवळ १७ हजार ७७८ ग्राहक कंपनीची सेवा घेत आहेत.
सन टीव्हीकडे २ हजार ५९६ ग्राहकांपैकी आता केवळ १ हजार ५८९ ग्राहक उरले आहेत. एअरटेल
आणि व्हिडीआॅकॉनच्या ग्राहकांत नाममात्र वाढ झाली आहे.
एअरटेलची ग्राहकसंख्या १४ हजार २९० वरून १५ हजार २६८ इतकी तर व्हिडीओकॉनच्या ग्राहकसंख्या १९ हजार ३२६ वरून २८ हजार १७८ झाली आहे.


४डीटीएच सेवेच्या माध्यमातून मुंबईकरांचे मनोरंजन होत असले तरी शासनाच्या तिजोरीतही मनोरंजन कराच्या रूपात कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे.
४२०१२-१३ साली शहरात १ लाख ५२ हजार ३२६ ग्राहक डीटीएचचा वापर करीत होते. त्यातून प्रशासनाला ७ कोटी २० लाख ९७ हजार रुपये करस्वरूपात मिळाले.
४२०१३-१४ साली त्यात वाढ होऊन १ लाख ८६ हजार ३८४ उपभोक्त्यांच्या माध्यमातून प्रशासनाने ९ कोटी ४ लाख ५७ हजार रुपयांचा गल्ला जमवला.
४तर २०१४-१५ साली प्रशासनाला मनोरंजन कराच्या माध्यमातून १० कोटी ९७ लाख ६ हजार रुपये मिळाले आहेत.

कंपनीजोडण्यामिळालेला महसूल
सन टीव्ही१,५८९१२ लाख ९६ हजार
रिलायन्स४,६२४३६ लाख ७९ हजार
एअरटेल१५,२६८९१ लाख ५४ हजार
डिश टीव्ही१७,७७८१ कोटी ९ लाख १८ हजार
व्हिडीओकॉन२८,१७८१ कोटी ५० लाख ४२ हजार
टाटास्काय१,२३,०९५६ कोटी ९६ लाख १७ हजार
एकूण १,९०,५३२१० कोटी ९७ लाख ६ हजार

 

Web Title: DTH subscribers rise in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.