अहमदाबादच्या मद्यपी बंधूंचा धिंगाणा,पोलिसाला मारहाण
By Admin | Updated: May 22, 2016 12:14 IST2016-05-22T12:14:52+5:302016-05-22T12:14:52+5:30
मुंबई दर्शनासाठी आलेले कमलसिंग भरतसिंग परमार, आकाश भरतसिंग परमार हे बंधू सायन येथील एका हॉटेल मध्ये थांबले होते.

अहमदाबादच्या मद्यपी बंधूंचा धिंगाणा,पोलिसाला मारहाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबई दर्शनासाठी आलेले कमलसिंग भरतसिंग परमार, आकाश भरतसिंग परमार हे बंधू सायन येथील एका हॉटेल मध्ये थांबले होते. ते मुळचे अहमदाबाद येथील रहिवासी आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत त्यांनी हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. घटनास्थळी दाखल झालेल्या सायन पोलीस ठाण्याचे बीट मार्शलला मारहाण केली. जखमी पोलिसावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून, मद्यपी बंधूंना अटक करण्यात आली आहे.