मद्यधुंद तरुणाचा शिवडी रेल्वे स्थानकात महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:14+5:302021-02-16T04:08:14+5:30

मुंबई : मद्यधुंद तरुणाने सोमवारी सकाळी शिवडी रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. या तरुणाच्या हातात चाकू होता. त्याने रेल्वे स्थानकातील ...

Drunk youth attacks female employee at Shivdi railway station | मद्यधुंद तरुणाचा शिवडी रेल्वे स्थानकात महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

मद्यधुंद तरुणाचा शिवडी रेल्वे स्थानकात महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

मुंबई : मद्यधुंद तरुणाने सोमवारी सकाळी शिवडी रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. या तरुणाच्या हातात चाकू होता. त्याने रेल्वे स्थानकातील कार्यालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. नावेद खान असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडील चाकू जप्त करण्यात आला आहे.

नावेद खानने सोमवारी सकाळी शिवडी रेल्वे स्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात चाकू घेऊन धिंगाणा घातला. रेल्वे स्थानकातील कार्यालयात उद्घोषणा करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे दारू मागितली. या महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली व रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलवर या तरुणाने हल्ला केला.

या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. रेल्वे स्थानकात तरुण हातात चाकू घेऊन फिरत असल्याने प्रवाशांमध्येही घबराट पसरली होती. रेल्वे पोलिसांनी या तरुणाला पकडले आणि रेल्वे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेले. तेथेही त्याने गोंधळ घातला आणि कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर या तरुणाची रेल्वे पोलिसांनी कोठडीत रवानगी केली. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

..................

Web Title: Drunk youth attacks female employee at Shivdi railway station