Join us
Daily Top 2Weekly Top 5

मद्यप्राशन केलेल्या महिला वैमानिकाला केले निलंबित, एअर इंडियाची कारवाई

By मनोज गडनीस | Updated: April 9, 2024 18:01 IST

७८७ जातीच्या विमानाचे सारथ्य करत असल्यामुळे सेलिब्रिटी वैमानिक अशी या वैमानिकाची ओळख आहे.

मुंबई - विमान उड्डाणापूर्वी बंधनकारक असलेल्या मद्यचाचणी दरम्यान सकारात्मक आढळून आलेल्या एका महिला वैमानिकालाएअर इंडियाने निलंबित केले आहे. ७८७ जातीच्या विमानाचे सारथ्य करत असल्यामुळे सेलिब्रिटी वैमानिक अशी या वैमानिकाची ओळख आहे.प्राप्त माहितीनुसार, दिल्लीहून हैदराबादसाठी ६ एप्रिल रोजी ही महिला विमान घेऊन जाणार होती. मात्र, उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या मद्यचाचणी दरम्यान तिचे निकाल सकारात्मक आले. त्यानंतर तिला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात देखील मद्यप्राशन करून परदेशातून भारतात विमान घेऊन आलेल्या एका वैमानिकाला बडतर्फ करण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या नियमानुसार विमानाच्या प्रवासाअगोदर व नंतर मद्यप्राशनाची चाचणी करण्यात येते.

टॅग्स :एअर इंडियावैमानिक