ड्रग्ज विक्रेत्याकडून तरुणाची हत्या

By Admin | Updated: May 10, 2016 02:20 IST2016-05-10T02:20:32+5:302016-05-10T02:20:32+5:30

किरकोळ भांडणातून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना मालाडमध्ये रविवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या फरार भावाचा शोध सुरू आहे.

Druggist murdered by the seller | ड्रग्ज विक्रेत्याकडून तरुणाची हत्या

ड्रग्ज विक्रेत्याकडून तरुणाची हत्या

मुंबई : किरकोळ भांडणातून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना मालाडमध्ये रविवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या फरार भावाचा शोध सुरू आहे.
संजय सोनी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मालाडच्या के. डी. हाइट्स येथील चार क्रमांकाच्या इमारतीत राहात होता. सोनी हा इमिटेशन ज्वेलरीचे काम करायचा, तर या प्रकरणी अटक करण्यात आलेला निलेश वाघेला (२४) हा एम्ब्रॉयडरीचे काम करतो. या दोघांचे चार ते पाच दिवसांपूर्वी काही कारणावरून भांडण झाले होते. त्या वेळी विपुलने त्याला चाकू काढून धमकावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल हा अंमली पदार्थांची विक्री करतो, ज्याची माहिती फक्त सोनीला होती. सोनी विपुलचा पर्दाफाश करेल, याची भीती त्याला होती.
त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी विपुलने त्याचा भाऊ निलेशमार्फत सोनीला रविवारी रात्री तो राहत असलेल्या हलीमभाई गुलाम चाळीमध्ये पार्टी करण्याच्या निमित्ताने बोलावले. त्या वेळीदेखील या दोघांचे वाजले, ज्याचे पर्यवसन हाणामारीत झाले, ज्यात विपुल आणि त्याचा भाऊ निलेश यांनी सोनी याच्यावर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर विपुल हा पसार झाला. मात्र, निलेशला पोलिसांनी अटक केली. सध्या पोलीस विपुलचा शोध घेत आहेत. सोनीचे पालक सध्या उज्जैनला गेले आहेत. पोलिसांनी या हत्येची माहिती सोनीचा मोठा भाऊ अजय याला दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Druggist murdered by the seller