टॅटूच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:06 IST2021-04-16T04:06:25+5:302021-04-16T04:06:25+5:30

विरारमधून तरुणाला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टॅटू काढण्याच्या निमित्ताने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अमली ...

Drug trafficking through tattoos | टॅटूच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी

टॅटूच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी

विरारमधून तरुणाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टॅटू काढण्याच्या निमित्ताने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) विरारमधून अटक केली. रोहित वाघेला असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून एमडी, एलएसडी व अन्य मादक पदार्थ जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहित वाघेला हा टॅटू काढण्याचे काम करीत असे, त्यानिमित्ताने त्याचा महाविद्यालयीन तरुण-तरुणीशी संपर्कात हाेता. त्यानुसार ताे त्यांना पार्टीसाठी अमली पदार्थाचा पुरवठा करत असे. ग्राहकांशी ताे कोडवर्डमध्ये केवळ अर्धा मिनिट फोनवर बोलून ऑर्डर घेत असे. त्यामुळे त्याच्याबद्दल इतरांना संशय येत नसे. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या पथकाने पाळत ठेवून त्याला विरारमधून अटक केली. त्याच्या अन्य साथीदारांबद्दल चौकशी करण्यात येत आहे.

........................

Web Title: Drug trafficking through tattoos